‘जिओ’ आणणार सर्वात स्वस्त 5 जी स्मार्ट फोन
मुंबई : रिलायन्स जिओकडून ग्राहकांसाठी एक मोठा धमाका केला जाण्याची शक्यता आहे. 5 हजार रुपये किंमत असलेला 5जी स्मार्ट फोन आता अडीच ते तीन हजार रुपयांमध्येच ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती, कंपनीच्या एका अधिकार्याकडून समोर आली आहे.
रिलायन्स जिओच्या अधिकार्याने सांगितले की, कंपनीचे लक्ष 2जी चा वापर करणार्या 20 ते 30 कोटी वापरकर्त्यांवर आहे. सुरुवातीस 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5जी स्मार्ट फोन आणण्याचा विचार आहे. त्यानंतर मागणी वाढल्यास त्याची किंमत आणखी कमी करून अडीच ते तीन हजार रुपये केली जाऊ शकते. मात्र, यासंबंधी अद्याप जिओकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सद्यस्थितीस भारतात 5जी स्मार्टफोनची किंमत 25 हजार रुपयांपासून पुढे आहे.
Post a Comment