आज ४७५ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, आतापर्यंत ४९ हजार ७१२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

 दिनांक: १७ ऑक्टोबर, २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत अहवाल


आज ४७५ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज


आतापर्यंत ४९ हजार ७१२ रुग्ण बरे होऊन परतले घरी


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७९ टक्के
अहमदनगर: जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ७१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.७९ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १९२७ इतकी आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०६, अकोले २४, जामखेड २०, कर्जत २२, कोपरगाव १२, नगर ग्रा. ३१, नेवासा २२, पारनेर १४, पाथर्डी ६८, राहाता ३१, राहुरी १८, संगमनेर ५०, शेवगाव ११, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:४९७१२


उपचार सुरू असलेले रूग्ण:१९२७


मृत्यू:८०३


एकूण रूग्ण संख्या:५२४४२


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका


माझेकुटुंबमाझी_जबाबदारी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post