नगर: जिल्ह्यात आज २५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज ,तर ३५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

 दिनांक: २२ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजता

आतापर्यंत ५१ हजार ५०० रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०६ टक्के

आज २५० रुग्णांना डिस्चार्ज तर ३५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर: जिल्ह्यात आज २५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ५०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवार)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३५३  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८४१ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०९ आणि अँटीजेन चाचणीत १९३ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०१, जामखेड ०२, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०३, पारनेर ०३, पाथर्डी ०२, राहाता ०७, राहुरी ०२, संगमनेर ०७, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, जामखेड ०४, कर्जत ०१, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण १९, नेवासा ०८, पाथर्डी ०३, राहुरी ०५, संगमनेर ०१, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०४ आणि मिलिटरी हॉस्पिटल १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १९३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा २१, अकोले ०२, जामखेड १८, कर्जत १९,   नगर ग्रामीण ०७, नेवासा ०९, पारनेर १३, पाथर्डी १७, राहाता १९, राहुरी १०, संगमनेर १७, शेवगाव २३, श्रीगोंदा ०९, आणि श्रीरामपूर ०९, अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३३, अकोले २६, जामखेड १५, कर्जत ०९, कोपरगाव १०, नगर ग्रा ०८, नेवासा १६, पारनेर ०६, पाथर्डी ४४, राहाता २०, राहुरी ०७, संगमनेर १५, शेवगाव १३, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १०, कॅन्टोननमेंट बोर्ड  ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:५१५००


उपचार सुरू असलेले रूग्ण: १८४१


मृत्यू:८३५


एकूण रूग्ण संख्या:५४१७६

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post