आज २८९ रुग्णांना डिस्चार्ज तर १६४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

 दिनांक: २६ ऑक्टोबर २०२०, सायंकाळी ६-३० वाजता


आतापर्यंत ५२ हजार ६५५ रुग्ण बरे होऊन परतले घरी


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५१ टक्के


आज २८९ रुग्णांना डिस्चार्ज तर १६४ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर: जिल्ह्यात आज २८९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.५१टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६३१ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १९ खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३१ आणि अँटीजेन चाचणीत ११४ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०८ नगर ग्रामीण ०२, पारनेर ०४, संगमनेर ०१, श्रीगोंदा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, कर्जत ०१,  कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०१, राहाता ०३, संगमनेर ११, शेवगाव ०३, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ११४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा ०६, अकोले ०९, जामखेड ०५, कर्जत ०५, कोपरगाव ०३,  नगर ग्रामीण १३, नेवासा ०५, पारनेर ०९, पाथर्डी ११, राहाता ११, राहुरी ११, संगमनेर १३, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ६६, अकोले ३४, जामखेड २९, कर्जत ०६, कोपरगाव ०५, नगर ग्रा १५, नेवासा २३, पारनेर १०, पाथर्डी २०, राहाता २४, राहुरी ०६, संगमनेर २७, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर १५ आणि कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:५२६५५


उपचार सुरू असलेले रूग्ण: १६३१


मृत्यू:८४३


एकूण रूग्ण संख्या:५५१२९


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका


माझेकुटुंब_माझीजबाबदारी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post