बिबट्याच्या जबड्यातून तिने सोडवले आपल्या पिल्लाला....व्हिडिओ

बिबट्याच्या जबड्यातून तिने सोडवले आपल्या पिल्लाला....व्हिडिओ

आई व तिच्या बाळाचे नातं प्रचंड जिव्हाळ्याचे असतं. हे फक्त मानवाच्याबाबतीतच नाही तर प्राण्यांच्याबाबतही असतं. सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात बिबट्याने पकडलेल्या आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी रानडुक्कराने केलेला यशस्वी प्रयत्न दिसून येत आहे. जंगलातील एक बिबट्या एका पिल्लाला जबड्यात पकडून धूम ठोकतो. त्याचवेळी एक रानडुक्कर धावत येते व त्याला पाहताच बिबट्या तोंडातील पिल्लाला सोडून धूम ठोकतो, असे या व्हिडिओत दिसत आहे. पिल्लासाठी मोठ्या शक्तीशीही झुंज घेण्याची तयारी असल्याच या प्राण्याने दाखवून दिलं. सोशल मिडियावर व्टिटरवरील या व्हिडिओला नेटकर्‍यांची चांगलीच दाद मिळत आहे.
व्हिडिओ सौजन्य व्टिटर..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post