वाकोडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

 वाकोडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

साकळाई पाणी योजनेचा पाठपुरावा अंतिम टप्प्यात : आ. निलेश लंके
Add caption

नगर : अनेक वर्षांपासून साकळाई पाणी योजनेचे काम आपण फक्त निवडणुकीपुरते ऐकत आहोत. निवडणुका आल्या की पुढारी गाडी, भोंगा व माईक हातात घेऊन
गावोगावी सभा, बैठका घेऊन साकळाई पाणी योजनेचे काम पूर्ण झाले पाहिजे, असे सांगत असतात. निवडणुका संपल्या की जनतेला पुन्हा वाऱ्यावर सोडून दिले जाते.
निवडणुका आल्या की साकळाई पाणी योजना आठवते. आता पुढाऱ्यांचा साकळाई पाणी योजनेचा धंदा बंद होणार आहे. साकळाई पाणी योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु
केले आहे. त्या योजनेच्या पाठपुराव्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाळकीत ही
योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले. महाराष्ट्राची ताकत शरद पवार आहे. के. के. रेंजमधील जमीन संदर्भात त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह
यांच्याकडे हा प्रश्न घेऊन गेल्यानंतर त्यांनी लगेच आश्वासन दिले की, संरक्षण खाते, शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करणार नाही. मध्यंतरी काही पुढारी गावो गावी जाऊन
के. के. रेंजबाबत शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल, असे सांगत आहे. परंतु आम्ही तुमचा एक गुंठाही जाऊन देणार नाही. मी स्वत: रणगाड्याखाली झोपेल असे
प्रतिपादन आ. निलेश लंके यांनी केले.

नगर तालुक्‍यातील वाकोडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आ. निलेश लंके यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सरपंच हरिभाऊ कर्डिले, उपसरपंच अमोल
तोडमल, मंजाबापू मोढवे, भाऊसाहेब मोढवे, सचिन कराळे ,जगन्नाथ मोढवे, विजय कराळे, अंकुश गवळी, माणिक गवळी, मुरलीधर गोरे, मल्हारी मोढवे, बबन मोढवे, हौशाबापू गवळी,
प्रल्हाद गवळी, प्रदीप लुंकड, अमोल गोरे, आदिनाथ कराळे, सचिन तोडमल, दादा सुंबे, सचिन पठारे , सचिन गवारे,बाळासाहेब लंके, सचिन निमसे, सुनील कोकरे, गणपत शिंदे, दिलीप
लांडगे, मारुती आमले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले की, आपल्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट आलेआहे. यामध्ये सर्वांनी सेवाभाव दाखवून जनतेला सहकार्य करावे. राज्यात
सर्वात मोठे कोविड सेंटर सुरु केले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अन्नदानही केले आहे. पुढील काळामध्ये मतदारसंघाच्या विकासाला चालना देणार आहे. विविध
योजनेतून मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारसंघाचा मी आमदार नव्हे तर जनसेवक आहे. विकासाचे कामे तर होणारच आहे.
परंतु नागरिकांनी या वर्षात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लक्षणे आढळळ्यास तपासणी करून घ्यावे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत तालुक्‍यातील
प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे, असे ते म्हणाले.

हरिभाऊ कर्डिले म्हणाले की, शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून गावामध्ये विकास कामे सुरु आहे. आ. निलेश लंके यांनी आमदार निधीतून दत्त मंदिराचे
सभामंडप मंजूर करुन दिले आहे. विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. आ. लंके यांनी पुढील चार वर्षामध्ये गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी
मिळवून देण्याची व्यवस्था करावी. नगर शहराच्या जवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक लोकवस्ती वाढत आहे. त्यांना मुलभूत सुविधांपासून काम करावे लागत आहे.
त्यामुळे मोठ्याप्रमाणात निधीची कमतरता भासत असते. वाकोडी ग्रामपंचायतने सर्वांगीण विकासाला चालना दिली असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल
तोडमल यांनी केले. आभार प्रदर्शन मंजाबापू मोढवे यांनी मानले.
फोटो ओळी


संलग्‍नके क्षेत्र

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post