करोना काळात वाफ घ्यायचीय? पहा हा जुगाड...VIDEO

 करोना काळात वाफ घ्यायचीय? पहा हा जुगाड...VIDEOनगर : करोना काळात प्रत्येक जण स्वत:च्या आरोग्याबाबत सतर्क झालेला आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी नित्यनियमाने वाफ घेणे फायदेशीर ठरते असे सांगितले जात आहे. परंतु, घरी वाफेचे मशिन आणणे, ते वापरणे तसे खर्चिक असते. त्यावर एकाने एक आगळावेगळा जुगाड करीत वाफेचे दुकानच सुरु केलं आहे. प्रेशर कुकरला तीन नॉब बसवत संबंधिताने वाफ मिळण्याची सोय केली आहे. प्रत्येकाने नंबर लावून थांबायचे, आपला नंबर आल्यावर वाफ घ्यायची व निघायचे. या आगळ्यावेगळ्या जुगाडाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्याला भरपूर लाईक्सही मिळत आहे.

VIDEO0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post