विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकार्यांच्या हस्ते श्रींची उत्थापन पूजा

विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकार्यांच्या हस्ते श्रींची उत्थापन पूजा 
मिरवणुक न काढता गणपती बाप्पाला निरोप


अहमदनगर: नगरचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात अनंत चतुर्दशीला सकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते श्रींची उत्थापन पूजा झाली. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी तसेच मोजकेच भाविक उपस्थित होते.  करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. विसर्जन मिरवणूकही टाळण्यात आली. विशाल गणपती मंदिरात उत्सव काळात झालेले कार्यक्रम सोशल मिडियातुन लाईव प्रक्षेपित करण्यात आले.  श्रींचे विसर्जनही मिरवणूक न काढता साधेपणाने करण्यात आले. पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप देताना करोनाच्या संकटातुन सर्वांची लवकर मुक्तता करावी, असे साकडे गणरायाचरणी घालण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post