भाजप नेत्या पंकजा मुंडे ‘या’ कारणासाठी शरद पवारांना भेटणार


भाजप नेत्या पंकजा मुंडे ‘या’ कारणासाठी शरद पवारांना भेटणार

मुंबई : भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक होण्याचे ठरवले आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असं सांगितले. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून सर्व ऊसतोड कामगार आणि मजुरांना धीर ठेवण्याचे आवाहन केले आहे.  ‘कोयत्याला  न्याय मिळेल. ऊसतोड  कामगारांनी विश्वास ठेवावा. खासदार शरद पवार, जयंत पाटील, दांडेगावकर चेअरमन साखर कारखाना संघ यांच्याशी चर्चा करणार आहे’ असं पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. पंकजा मुंडेंनी 3 ट्वीट केले आहे ’माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, कारखानदारांचे प्रतिनिधी ना.जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष  जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे.’ असं पंकजांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. ’आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे’ असं आवाहनही पंकजांनी कामगारांना केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post