प्राथमिक शिक्षकांना कॅशलेस आरोग्यविमा योजना लागू करावी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

प्राथमिक शिक्षकांना कॅशलेस आरोग्यविमा योजना लागू करावी

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी 


राज्यातील सर्व  शिक्षकांना कॅशलेस आरोग्यविमा योजना लागू करावी अशी  मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली. राहुरीचे नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन देण्यात आले.

नायब  तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचा अपघाती/ नैसर्गिक मृत्यू झाला आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची विशेष आर्थिक मदत तातडीने मिळावी, सर्व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत  प्राथमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे  नवीन लाभाची  सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (१०:२०:३०) वर्षे तात्काळ लागू करावी,विस्ताराधिकारी
( शिक्षण) व  केंद्र प्रमुख पदे अभावितपणे शिक्षकांमधून तात्काळ भरावीत,जिल्हा परिषद शाळांची विद्युत देयके शासनाने भरावीत,
कोविड-१९च्या साथरोग नियंत्रणासाठी  कर्तव्य बजावत  असताना  ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अशा शिक्षकांच्या कुटुंबीयांना तातडीने पन्नास लाखाचे विमा संरक्षण मिळावे. सदरील पन्नास लक्ष रुपयांचे अनुदान रक्कम त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ अदा करावी,२७/०२ च्या जिल्हा अंतर्गत बदली च्या शासन निर्णया नुसार जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या  प्रक्रिया सर्व जिल्हा परिषदांनी  तात्काळ राबवावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने रवींद्र अरगडे,कल्याण राऊत,अमोल लांबे,भाऊसाहेब फंड,काशिनाथ भारमल आदिंनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post