जामखेडमधील ल.ना.होशिंग विद्यालयात शिक्षक दिन साजरा...व्हिडिओ

जामखेडमधील ल.ना.होशिंग विद्यालयात शिक्षक दिन साजरा...व्हिडिओ
कोविड योध्द्‌यांचा सन्मानपत्र देवून गौरव

जामखेड (नासीर पठाण): भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. विज्ञानमूल्य असलेली तसेच अध्यात्मप्रवण पिढी घडावी यासाठी 40 वर्ष राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,रवींद्रनाथ टागोर,डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम,स्वामी विवेकानंद, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान विभूतींचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. ल.ना.होशिंग विद्यालयात सोशल डिस्टंसिंग पाळत पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व  तहसीलदार विशाल नाईकवाडे, डॉ.युवराज खराडे,उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, खजिनदार राजेश मोरे, अशोक शिंगवी ,अनंता खेत्रे  तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी लॉकडाऊनच्या काळात विलगीकरण कक्षामध्ये व जामखेडमधील विविध चेकपोस्टवर संस्थेतील कर्मचार्‍यांना ड्युटी देण्यात आल्या होत्या. त्यांचा संस्थेच्यावतीने सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. कर्तव्यदक्ष तहसीलदार विशाल नाईकवाडे, डॉ.युवराज खराडे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. ल.ना.होशिंग विद्यालयातील विलगीकरण सेंटरमुळे अनेक जणांना चांगल्या सुविधा प्राप्त झाल्यामुळे, डॉ.खराडे यांनी संस्थेचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी केले तर आभार श्रीधर जगदाळे यांनी  मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी टी गायकवाड व अनिल देडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोपट जरे,रमेश अडसूळ,मुकुंद राऊत, निलेश भोसले,अविनाश नवगिरे आदींनी परिश्रम घेतले.
व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post