नगर जिल्ह्यातील नारायण मंगलारम यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार... व्हिडिओ

नगर जिल्ह्यातील नारायण मंगलारम यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार... व्हिडिओ
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने मंगलारम यांचा सन्मान

नगर : नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलारम यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. शिक्षक दिनी व्हर्च्युअल पध्दतीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत या पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला. नगरमध्ये जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी मंगलारम यांना पुरस्कार प्रदान केला. मंगलारम यांच्या शैक्षणिक कार्यातील योगदानाचा गौरव करणारी चित्रफीतही प्रसारीत करण्यात आली. मंगलारम हे कृतीशिल शिक्षक म्हणून ओळखले जातात. सतरा वर्षांच्या सेवेत त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यात मोठे योगदान दिलं आहे.
 व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post