पाथर्डी शिक्षक बँकेच्या शाखेला ठोकले सदिच्छा मंडळाने टाळे ,शिक्षक भवनाचे भाडे हडप करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

पाथर्डी शिक्षक बँकेच्या शाखेला ठोकले सदिच्छा मंडळाने टाळे
शिक्षक भवनाचे भाडे हडप करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्नऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खाऊ नये अशी आपल्याकडे म्हण आहे,परंतु सध्याचे सत्ताधारी संचालक मंडळ मात्र अधाशासारखं किती खावं याचंही भान त्यांना राहिलेलं नाही.घड्याळ प्रकरणावरून पूरती छी थू झाल्यानंतर सत्ताधारी त्यातून शहाणपण स्वीकारायला तयार नाहीत.याच प्रकरणावरून आज पाथर्डी येथील प्राथ शिक्षक बँकेच्या शाखेला सदिच्छा मंडळाच्या वतीने टाळे ठोकण्यात आले.
             याबाबत सविस्तर माहिती अशी कि,घड्याळ साठवणूक करणेसाठी तालुक्याच्या ठिकाणी गोदामं भाड्याने घेण्यात आली आहेत.पाथर्डीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक भवन आहे.हे भवन भाड्याने घेण्यासंबंधी माजी संचालक गहिनीनाथ शिरसाठ यांना शाखाधिकारी यांनी फोनवरून विचारणा केली,शिरसाठ सर यांनीही संमती दर्शवली व त्यापोटी येणारे भाडे संघाच्या प्रतिनिधींच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले.परंतु शाखाधिकारी व विद्यमान संचालक यांनी संगनमताने सदर भाड्याचे पैसे गोरे नावाच्या कर्मचाऱयाच्या नावे जमा केले.व त्यानंतर सदर रक्कम विद्यमान संचालक अर्जुन शिरसाठ व मिनिनाथ देवकर यांच्या नावे बेकायदेशीर खाते उघडून त्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आले.सदर प्रकार सदिच्छा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आला व सर्वांनी मिळून शाखाधिकारी यांना जाब विचारला असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने ज्या शिक्षक भवनात बँकेचे कामकाज चालू आहे त्या भवनास सदिच्छा मंडळाच्या वतीने टाळे ठोकण्यात आले.
              ज्यांची प्राथमिक शिक्षक संघातून हकालपट्टी करण्यात आलीय,ज्यांनी केलेल्या कार्यकारण्या राज्य संघाने बेकायदेशीर ठरवल्या आहेत त्यांनीच संघाच्या नावाखाली केवळ पैसे हडप करण्याच्या दृष्टीने केलेले हे धाडस संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून सत्ताधारी मंडळ टीकेचे धनी ठरत आहे.

   सुरेश खेडकर (नेते सदिच्छा मंडळ)  गेल्या 10 महिन्यांपासून  शिक्षक भवन बँकेच्या ताब्यात आहे,त्याच्या भाड्यापोटी येणारे 80 हजार रुपये शिक्षक संघाच्या नावे जमा होणे अपेक्षित होते,मात्र व्हा.चेअरमन अर्जुन शिरसाठ यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून सदर रक्कम परस्पर हडपण्याचा केलेला प्रयत्न सदिच्छा मंडळाने हाणून पाडला. बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी चार दिवसात सदर रक्कम शिक्षक संघाच्या खाती जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने टाळेबंद आंदोलन मागे घेतले आहे.
     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post