अवघ्या 9 वर्षांची तन्वी डोळे बांधून पुस्तक अचूक वाचते...व्हिडिओ

अवघ्या 9 वर्षांची तन्वी डोळे बांधून पुस्तक अचूक वाचते...व्हिडिओ
डोळे बंद करून अचूकपणे रंग ओळखण्यातही वाकबगार

नेवासा (गणेश मुळे): डोळे बंद केल्यावर मनुष्याला आपल्या आसपास काय आहे हे ओळखू येत नाही. परंतु, नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील तन्वी पंडित ही अवघ्या 9 वर्षांची मुलगी डोळे कापडी पट्टीने बंद करून चक्क पुस्तक वाचते तेही अस्खलित कोणताही शब्द न चुकता. डोळे बांधून पुस्तक वाचण्याबरोबरच चलनी नोटांची किंमत एवढेच काय तर चक्क रंगही ती अचूकपणे ओळखते. अतिशय कमी वयात तिने ज्ञान साधना करून नियमित सराव , ध्यान धारणा , मिड ब्रेन अक्टिव्हेशनची जोड देत ही अनोखी हातोटी साध्य केली आहे. भेंडा येथील सराफ व्यवसायिक सागर पंडित यांची 9 वर्षांची कन्या तन्वी ही डोळे बांधून हाताच्या बोटांनी कागदावर लिहिलेले आकडे , पत्त्यांवरील इंग्रजी अक्षरे , चित्रे , प्रसिद्ध व्यक्तींची छायाचित्रे अचूक ओळखते तेव्हा समोरची व्यक्ती थक्क होऊन जाते.

व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post