राज्यसभेत गोंधळाप्रकरणी 8 सदस्यांवर निलंबनाची कारवाई
नवी दिल्ली : रविवारी कृषि विषयक विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घालणार्या आणि धक्काबुक्की करणार्या आठ खासदारांवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी निलंबनाची कारवाई केलीय. सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच सभापती नायडू यांनी याबाबतची घोषणा केली. सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे खा.राजीव सातव यांच्यासह डेरेक ओ’ब्रायन (तृणमूल कॉंग्रेस), संजय सिंह (आम आदमी पक्ष), के के रागेश (सीपीआई-एम), रिपुण बोरा (कॉंग्रेस), डोला सेन (तृणमूल कॉंग्रेस) यांचा समावेश आहे.
Post a Comment