सहाय्यक फौजदाराची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या


सहाय्यक फौजदाराची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

जालना : जालना पोलीस मुख्यालयात एका सहायक फौजदाराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहायक फौजदार सुभाष गायकवाड असं त्यांचं नाव आहे. या घटनेमुळे मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे. सुभाष गायकवाड यांनी मंगळवारी सकाळी 8.45 च्या सुमारास पोलिस मुख्यालयात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.गायकवाड यांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्येचे पाउल उचलले याचा तपास करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post