माध्यमिक शिक्षक सोसायटीला ऑनलाईन वार्षिक सभेची परवानगी मिळावी

माध्यमिक शिक्षक सोसायटीला ऑनलाईन वार्षिक सभेची परवानगी मिळावी
संस्थेचे जिल्हा उपनिबंधकांना पत्र

केडगाव : करोनाच्या वाढत्या उद्रेकाचा परिणाम सहकारी संस्थांवर होत आहे. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सभा अद्याप झालेली नसून वार्षिक सभेची मंजुरी नसल्याने अनेक निर्णयाची अंमलबजावणी थांबली आहे. यापार्श्वभूमीवर सोसायटीने ऑनलाईन पध्दतीने वार्षिक सभा घेण्याची परवानगी मागितली आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष काकासाहेब घुले व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी दिली.
संस्थेची वार्षिक सभा दरवर्षी जून अखेर होत असते. यंदा करोनामुळे ही सभा होवू शकलेली नाही. सध्याची परिस्थिती पाहता पूर्वीप्रमाणे सभा घेणेही शक्य नाही. यापार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन वार्षिक सभा घेण्याची मंजुरी मिळावी अशी मागणी सहकार विभागाकडे करण्यात आल्याचे ज्येष्ठ संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे व संस्थेचे सचिव स्वप्निल इथापे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post