रस्त्यावर उभ्या असलेल्या इसमाची सोन्याची चेन दिशाभूल करून लांबवली

रस्त्यावर उभ्या असलेल्या इसमाची सोन्याची चेन दिशाभूल करून लांबवली

नगर: श्रीगोंदा तालुक्यातील जामखेड - काष्टी रस्तयावर उभ्या असलेल्या इसमास सीआयडीचे अधिकारी असल्याचे भासवून एक तोळ्याची सोन्याची चेन लंपास करण्याचा प्रकार घडला आहे. भिमराव कवडे यांनी याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. कवडे हे शुक्रवारी दुपारी काष्टी रस्तयावर उभे असताना एका विनानंबरच्या दुचाकीवरून दोन अनोळखी इसम त्यांच्यापाशी आले. त्यापैकी एकाने मी सीआयडी अधिकारी आहे. पुढे गावात दंगल झाली आहे. त्यामुळे तुमच्या हातातील घड्याळ व गळ्यातील सोन्याची साखळी व्यवस्थित ठेवा, असे सांगितले. कवडे यांनी घाबरुन जात गळ्यातील सोन्याची साखळी काढून खिशात ठेवली. यावेळी चोरट्यांनी रूमालात या वस्तू ठेवण्यास सांगितले. कवडे तसे करीत असतानाच चोरट्यांनी चलाखीने चेन काढून घेतली व पलायन केले. या घटनेनंतर कवडे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post