8 वीतील मुलीने काढलेल्या पेन्सिल स्केचला खा. अमोल कोल्हेंची दाद

8 वीतील मुलीने काढलेल्या  पेन्सिल स्केचला खा. अमोल कोल्हेंची दाद

नगर : वांबोरी येथील महेश मुनोत विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणार्‍या सृष्टी वालचंद मांडगे हिने स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांची भूमिका करणारे खा.डॉ.अमोल कोल्हे यांचे संभाजी महाराजांच्या रुपातील अतिशय सुरेख चित्र रेखाटले आहे. लहान वयात तिने हे अतिशय हुबेहुब पेन्सिल स्केच साकारले असून खा.अमोल कोल्हे यांनीही या स्केचची दखल घेत सृष्टीचे कौतुक केले आहे. सृष्टीचे वडील वालचंद मांडगे यांनी व्टिटरवर हे चित्र शेअर केल्यावर स्वत: खा.कोल्हे यांनी चित्राला दाद दिली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post