‘यारो का यार’ असे व्यक्तीमत्त्व आपल्यातून निघून गेले

‘यारो का यार’ असे व्यक्तीमत्त्व आपल्यातून निघून गेले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अनिल राठोड यांना श्रध्दांजली

मुंबई : माजी मंत्री दिवंगत अनिल राठोड यांना विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शोकप्रस्तावावर बोलताना दिवंगत अनिल राठोड यांना श्रध्दांजली अर्पण केली. फडणवीस म्हणाले की, अनिल राठोड हे सर्वसामान्यांचे भैया होते. त्यांचे अचानक जाणे धक्कादायक होते. मी व अनिल राठोड मॅजेस्टिक आमदार निवासात समोरासमोर रहायचो. ते ‘यारो का यार’ असे व्यक्तीमत्त्व होते.नगरमध्ये त्यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख अशा जबाबदार्‍या पार पाडल्या. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कितीही मोठा संघर्ष करण्याची त्यांची तयारी असायची. 25 वर्षे ते आमदार होते. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी गरजूंसाठी अन्नछत्र सुरु केले होते. मी भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून नगरला गेलो असता ते माझ्या स्वागतासाठी शिवसैनिकांसह रस्त्यावर उभे होते. माझा मित्र एवढ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष झाला, असा त्यांना आनंद असायचा. माझे व त्यांचे खूप चांगले ऋणानुबंध होते, अशा शब्दात फडणवीस यांनी राठोड यांना श्रध्दांजली अर्पण केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post