अनिल राठोड यांचे कार्य ढाण्या वाघाप्रमाणे होते : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

अनिल राठोड यांचे कार्य ढाण्यावाघाप्रमाणे होते : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
स्व.अनिल राठोड यांना विधानसभेत श्रध्दांजली

मुंबई : माजी मंत्री दिवंगत अनिल राठोड यांना विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, माझा अजूनही विश्वास बसत नाही की अनिल राठोड यांना श्रध्दांजली वाहवी लागतेय. राठोड हे शिवसेनेचे कट्टर सैनिक होते. राजस्थानहून महाराष्ट्रात आलेल्या राठोड यांनी नगरमध्ये कोणतीही मोठी संस्था, कारखाना पाठीशी नसताना पावभाजी, ज्युसची गाडी लावून काम केले. हे काम करतानाच ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झाले. त्यांच्याही ध्यानीमनी नसेल की ज्युसच्या गाडीवाला माणूस आमदार, मंत्री होईल. पण विचारांशी बांधिलकी व निष्ठा असल्याने त्यांनी ढाण्या वाघाप्रमाणे काम केले. अनेकदा व्यासपीठावरही त्यांचा मोबाईल वाजायचा व त्याव्दारे ते जनतेची कामे करीत असत. एक चळवळ्या, झुंजार व निष्ठावान कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post