भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांना सगळीकडे भ्रष्टाचारच दिसणार - अर्जुन शिरसाट

भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांना सगळीकडे भ्रष्टाचारच दिसणार - अर्जुन शिरसाट     
     
काल शिक्षक बँकेच्या पाथर्डी येथिल शाखेला काही स्वयंघोषित नेते आणी सगळ्यांमंडळाची पायधुळ झाडून आलेल्या अध्यक्षांनी टाळे ठोकले.जे. निवेदन दयायला होते त्यांच्याच
 (सादिच्छाच्या )कार्यकाळात, पाथर्डी शाखेत गरज नसताना लाखो रुपयाचे लॉकर खरेदी करून मालिदा खाणारे हेच तथाकथित पुढारी आहेत हे सर्वसामान्यसभासद आजही विसरलेला नाही.
शिक्षक भवनाची इमारत ही  कोण्या मंडळाची जहागीर नसून (आपल्या पुर्वजांनी सर्वच मंडळाचे पदाधिकारी ) पदरमोड करून उभा केलेली वास्तू आहे.
२०१४ साली ९० हजार रुपये दुरुस्तीसाठी खर्च करून १० हजार रुपयाचे रंगकाम केले आणी ८० हजार रु हडप करणारे हे पुढारी आज चांगल्या कामाला नाव ठेवून स्वतःची मालिन झालेली प्रतिमा सुधरवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत.
स्वतःला संघटनेचे नेते म्हणवणारे किती अज्ञानी आहेत हे ही सभासदांच्या लक्षात आले.
ज्या अर्जुन शिरसाट च्या नावाने पैसे हडप केल्याचा आरोप केला जातोय.,त्यांचे नावे बँकेत खाते नसून शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शिरसाट यांचे नावे खाते आहे. हे ही न समजाणारी ही भ्रष्टाचारी आणी वाटेकरी मंडळी आता आम्हाला सत्ता मिळेल या भाबडया आशेने दिसेल त्याला भ्रष्टाचारी म्हणत आहेत. जे शिक्षक भवन गेले कित्येक दिवस धुळ्खात पडले होते, खिडक्या तुटल्या होत्या, पक्षांनी आपली त्यात घरटी केली होती, फॅन जळाले होते लाईट गायब होती,दाराचा उंबरा सडला होता, दाराला फटी पडल्या होत्या आणी पावसाळ्यात चारही बाजूने पाणी गळत होते, छतावर जाण्याची सोय नव्हती, गच्चीला अनेक ठिकाणी खोल खोल खड्डे पडले होते, गेल्या २००३ सालापासून नगरपालिकेची ५० हजार रुपये भाडे आकारणी ( घरपट्टी )थकलेली होती. अशी दुरावस्था झालेल्या भवनाकडे २० वर्षात सत्ता उपभोगताना कधी दुरुस्तीचा विचारही या बोलघेवडया आणी प्रसिद्धीसाठी हापापलेल्या मंडळींनच्या डोक्यात आला नाही,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राजि नं ६६६९ /३९ / ANR/public trust या संघटनेचा आजीव सभासद असणाऱ्यानीच शिक्षक भवनावर बाबत बोलावे,
भुछत्राप्रमाणे दर पंचवार्षिकला एका संघटनेची आणी मंडळाशी घरोबा करणाऱ्यांनी आम्हाला तत्वज्ञान शिकवू नये.
शिक्षक संघाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे पाथर्डी तालुक्यातील शिक्षक संघाच्या प्रत्येक क्रियाशील सभासदाकडून वर्गणी गोळा करुन भवनाची देखभाल दुरूस्ती केली आहे,
शिक्षक बॅंकेचे दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात काही दिवसासाठी बँक शिक्षक भवन या ठिकाणी सुरू करण्याचा प्रस्ताव शाखाधिकारी यांनी दिल्याने करार करून प्रती माहे १० हजार रु याप्रमाणे व्यवहार ठरला,
प्राथमिक शिक्षक संघाच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचा ठराव झाला, त्याप्रमाणे माहे जानेवारी 2020 ते एप्रिल पर्यतचे रू ४०००० रु भाडे वर्ग करण्यात आले आहे.
शिक्षक भवनाच्या दुरुस्तीसाठीचा अंदाजे खर्च ४८ हजार रु झाला असून उर्वरित ८ हजार रु वर्गणी गोळा करण्यात आली व  काम पूर्ण करण्यात आले आहे, हे संबंधितांना माहित आहे पण
इतरांना भ्रष्टाचारी म्हणून आपल्या रांगेत आणून बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या भ्रष्टाचारी पुढाऱ्यांचा सर्वसामान्यसभासद निषेध करीत आहेत.

राज्य संघाचा वाद गेला गेल्या १४ वर्षापासून न्यायप्रविष्ठ आहे त्याबाबत करोडो रुपयांची संघाची मालमत्ता वादादित आहे,
उदा. १ )भेंडाळा,त्ता, गंगापूर येथिल जमिन, ५वी ते १०वी शाळा बी, एड कौलेज, डि, एड कॉलेज,
 २ ) बारामती येथिल शिक्षक भवन
३ ) पूणे एरंडवणे यैथिल शारदा निकेतन संस्था, व जागा होस्टेल
अशा अनेक जागेचा न्यायालयात वाद सुरू आहे.
परंतू कामकाज सुरू आहे. त्याचप्रमाणे पाथर्डी येथिल शिक्षक भवनाचे कामकाज नियमानूसारच सुरू आहे.
ज्यांना भ्रष्टाचार झाला आहे असे वाटत असेल तर त्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत....

-सर्वसामान्य सभासद आणी ठेवीदार यांना बँकेच्या दारात वेठीस धरून ठेवणे, कोवीडच्या काळात केलेले हे आंदोलन बेकायदेशिर आणी १४४ कलमाची पायमल्ली असल्याने संबधितावर गुन्हे दाखल करण्याचे प्रशासनाने ठरवले होते परंतू शिक्षकांची समाजातील इज्जत वाचवण्यासाठी संघाचे नेते, चेअरमन व्हा चेअरमन  व सर्व संचालक यांनी सबुरीची आणी शांततेची भूमिका घेतली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post