सरकार पाडायचा प्रयत्न करणार्‍या अधिकार्‍यांची नावे का जाहीर करीत नाही?

 महाविकास आघाडी सरकारबाबत माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचे मोठे वक्तव्य

सरकार पाडायचा प्रयत्न करणार्‍या अधिकार्‍यांची नावे का जाहीर करीत नाही?नगर : कोविड काळात राज्य सरकारने फक्त दोन दिवस विधीमंडळाचे अधिवेशन घेतले. त्यातही अभिनेत्री, पत्रकाराविरुध्द हक्कभंगाचे प्रस्ताव आणले. कोविड काळात सहा महिने उलटून गेले तरी रूग्णांना सुविधा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. उलट गहू, तांदूळ घोटाळा सरकारने केला आहे. केंद्राने मोफत उपलब्ध करून दिलेले धान्यही लोकांना व्यवस्थित उपलब्ध करून देण्याची दानत राज्याने दाखवली नाही, अशी टिका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केली आहे.

नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टिका केली. प्रा.शिंदे म्हणाले की, ओला दुष्काळ, रस्त्यांचे प्रश्न, आरोग्य अशा कोणत्याही विषयात राज्य सरकारला काम करता आलेले नाही. आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप कोणतेच प्रयत्न करीत नसून ते त्यांच्याच कर्माने पडेल. राज्याचे गृहमंत्रीच सांगतात की अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतंत्र भारतात ही पहिलीच घटना असेल. अधिकारीच सरकार पाडत असेल तर मंत्री काय करीत आहेत?, त्यांची नावे का जाहीर करीत नाहीत, असा सवालही प्रा.शिंदे यांनी उपस्थित केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post