करोना उपचार खर्चासाठी शिक्षक बँकेची 'कोविड कर्ज' योजना

करोना उपचार खर्चासाठी शिक्षक बँकेची कोविड कर्ज योजना
करोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास बँक पैसे थेट हॉस्पिटलला पाठवणार

नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने करोनाच्या पार्श्वभूमीवर सभासदांसाठी 2 लाख रुपयांचे कोविड कर्ज योजना जाहीर केली आहे. सध्या जगाला कोरोना महामारीने ग्रासलेले आहे, अशा या भयभीत वातावरणामध्ये शिक्षक सभासदांनाही अशाच संकटाला सामोरं जावं लागत आहे .अनेक शिक्षक सभासदांनी या कारणासाठी कर्ज सुरू करण्याची मागणी केली होती. यावर संचालक मंडळाचे मीटिंग मध्ये एक सकारात्मक निर्णय घेण्यात आला. एखाद्या सभासदाला दुर्देवाने करोना झाला व त्याला दवाखान्यात दाखल केल्यावर त्याची आर्थिक कुचंबणा होवू नये यासाठी कोविड कर्ज सुरु करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ज्या सभासदांना या कर्ज योजनेत सहभागी व्हायचे आहे ,त्यांनी आपला रोखा पूर्ण करून बँकेत जमा करावा आणि दुर्दैवाने आपल्याला करोना झाला आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर शिक्षक बँक आपल्या मदतीला धावून येईल. फक्त आपल्या नातेवाईकामार्फत संबंधित हॉस्पिटलचे कोटेशन, आपला पॉझिटिव्ह रिपोर्ट आपल्या शाखेत जमा करा. शिक्षक बँकेच्या शाखेतून हॉस्पिटलला बँकेतून रक्कम  चेकद्वारे अथवा आरटीजीएस व्दारे पाठविण्यात येईल, असे बँकेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post