जि.प.कर्मचारी सोसायटीचे माजी व्यवस्थापक अविनाश शिदोरे यांचे निधन
नगर : अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे माजी व्यवस्थापक अविनाश राजाराम शिदोरे यांचे दि.21 सप्टेंबर रोजी अल्प आजाराने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, वडील, 2 बंधू असा परिवार आहे. त्यांच्यावर अमरधाम येथे शोकाकूल वातावरणा अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाश शिदोरे यांनी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या प्रगतीत मोठे योगदान दिले. मनमिळावू स्वभावामुळे यांनी अतिशय उत्कृष्ट कामकाज करून संस्थेच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले. मागील वर्षी ते संस्थेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment