शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज – डॉ. नरेंद्र घुले पाटील
शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनासोबत अधिक नफ्यासाठी शेतमाल विक्रीचे तंत्र अवगत करावे असे आवाहन श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था व श्री.ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी केले. ते केव्हीके दहिगाव-ने यांनी आयोजित केलेल्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठकीच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते.
कोव्हीड १९ च्या लॉकडाऊन काळामध्ये देखील शेतकऱ्यांनी आपल्या कर्तव्यापासून मागे न हटता अवघ्या देशाला अन्नधान्य पुरवून देश सेवा केली वशेती क्षेत्राचे महत्व जगाला पटवून दिले. म्हणून शेतकऱ्यांचा सन्मान वाढविणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी ज्ञानार्जनासाठी डिजिटल तंत्रज्ञाच्या वापराविषयी माहिती करून घेऊन त्याचा उपयोग शेती उत्पन्न वाढीसाठी करणे आता काळाची गरज बनलेली आहे असे डॉ.नरेद्र घुले पाटील बोलत होते.
श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे केव्हीके दहिगाव-ने येथे सहाव्या शास्त्रीय सल्लागार समिती सभेचे आयोजन दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी करण्यात आले होते. कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सभा पार पडली. या सभेमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी चे कुलगुरू डॉ.के. पी. विश्वनाथा यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करावा व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापना कराव्यात असे आवाहन केले.
या प्रसंगी अटारी पुणे झोन ८ चे शास्त्रज्ञ डॉ.अमोल भालेराव यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्राची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.शिवाजीराव जगताप यांनी बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये करावयाचे बदल या विषयी विवेचन केले.
बैठकी दरम्यान केव्हीके दहिगाव-ने च्या कामाकाजाबाद्दलचा आढावा वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमख डॉ.एस.एस.कौशिक यांनी दिला तर श्री. माणिक लाखे यांनी कृती आराखड्याचे सादरीकरण केले.
या सभेसाठी संस्थेचे सचिव श्री.काकासाहेब शिंदे, इफको कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक श्री. डी.बी. देसाई, भारतीय ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.ज्ञानेश्वर बोरसे, रेशीम विभाग अहमदनगर चे सहाय्यक संचालक बी.डी. डेंगळे, मस्त्यपालनविभागाचे श्री.कुडले, म.फु.कृ.वी. राहुरी चे डॉ.भगवान देशमुख, नाबार्ड अहमदनगर चे शिलकुमार जगताप, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर चे श्री. राठी, जिल्हा बियाणे प्रमाणपत्र अधिकारी अहमदनगर चे डी.एस.बरढे, कृषि अधिकारी श्री. कानिफनाथ मरकड, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.एम.बी.लाड उपस्थित होते.
या बैठकीस शेतकरी प्रतिनिधी श्री.हुकुमबाबा नवले, काकासाहेब काळे, रतन मगर, रेवणनाथ उकिर्डे, संजय तनपुरे, काकासाहेब घुले, डॉ.दिलीप बर्डे उपस्थित होते.
या सल्लागार समिती बैठकीच्या यशस्वीतेसाठी केव्हीके चे शास्त्रज्ञ श्री. नारायण निबे, नंदकिशोर दहातोंडे, डॉ. सोमनाथ भास्कर, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे, वैभव नगरकर, प्रविण देशमुख, अनिल देशमुख व इतर कर्मचारी यांनीपरिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन बडधे व आभार इजि. राहुल पाटील यांनी केले.
Post a Comment