कोव्हीड-१९ या गंभीर आजाराचा समावेश वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या यादीत करावा

 कोव्हीड-१९ या गंभीर आजाराचा समावेश  वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या यादीत करावा

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची महाराष्ट्र शासनाकडे मागणी



अहमदनगर : कोरोना -१९ या गंभीर आजाराचे संकट संपूर्ण महाराष्ट्रभर गडद होत आहे. शासकीय अधिकारी /कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी या गंभीर आजाराच्या निर्मूलनासाठी विविध पातळीवर अहोरात्र काम करत आहेत. त्यातून अनेक कर्मचाऱ्यांना बाधा झालेली आहे.शासकीय कर्तव्य पार पडतांना या आजाराची लागण झाल्यास सध्या असलेला बेडचा तुटवडा व इतर अत्यावश्यक बाबीसाठी कर्मचाऱ्यांना  खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. कोव्हीड -१९ या आजाराचा वैद्यकीय प्रतिपूर्ती साठी शासनाने निर्देशित केलेल्या  विर्निदिष्ट आजारामध्ये समावेश नसल्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना हा कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती अंतर्गत सद्यस्थितीत गंभीर आजाराच्या यादीत कोव्हीड -१९चा समावेश करावा अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी दिली .

मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री  व आरोग्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी यांना वैद्यकीय खर्च परिपूर्ती च्या मंजुरी संदर्भात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेवा देखभाल नियम १९६१ व त्या संदर्भात वेळोवेळी निर्गमित संदर्भ शासन निर्णय यामधील  तरतुदीच्या अधीन राहून आकस्मिक उद्भवणाऱ्या २७ व आकस्मिक ५ अशा गंभीर आजारांवर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारांवरील परिगणना वैद्यकीय देयकाने करण्यात येते .

याव्यतिरिक्त सारी, स्वाईन फ्लू, लिव्हर प्रत्यारोपण, डेंग्यू, सोरायसिस आदी या गंभीर रोगांचा समावेश करण्याबाबत  निवेदनाद्वारे  विनंती केली आहे.


या मागणीचे स्वागत राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे,राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव,राज्य संघटक राजेंद्र निमसे यांच्यासह अहमदनगर संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, शरद वांढेकर, सुरेश नवले, रामराव ढाकणे, राजकुमार शहाणे, उत्तम शेलार,संजय शेळके, विष्णू चौधरी, दत्तात्रय परहर, विष्णू बांगर,प्रदिप 

चक्रनारायण, संदीप भालेराव,संजय सोनवणे,शिवाजी ढाकणे, बापूराव वावगे,महेश लोखंडे , पावलस गोरडे, सुधीर रणदिवे , मधुकर डहाळे, रज्जाक सय्यद,संभाजी तुपेरे, विलास लवांडे, रविंद्र अनाप, सुधीर बोऱ्हाडे, जनार्दन काळे, ज्ञानदेव कराड, लक्ष्मण चेमटे, ,पांडुरंग देवकर ,भारत शिरसाठ,अनिल शिरसाठ, राजेंद्र खंडागळे, सचिन शेरकर, प्रविण शेळके, बथूवेल हिवाळे , शहाजी जरे, दत्तात्रय बर्गे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दिपाली बोलके ,जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके, शिक्षक बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे ,संगीता निगळे, मनीषा गोसावी, उज्वला घोरपडे ,सुरेखा बळीद, सविता नागरे ,मनीषा क्षेत्रे ,ज्योती करांडे आदिनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post