पावसाळी अधिवेशनासाठी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कराडहुन मुंबईकडे रवाना

कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पावसाळी अधिवेशनासाठी सहकारमंत्री नामदार बाळासाहेब पाटील कराडहुन मुंबईकडे रवाना


 महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदर बाळासाहेब पाटील यांनी दि.५ सप्टेंबर रोजी आर.टी.सी.पी. आर.(कोरोना 19) चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून विधानसभेच्या कामासाठी ते कराड हुन मुंबईला  रवाना झाले आहेत.
दि. १४ ऑगस्ट रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असता त्यांना उपचारासाठी कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांनी  उपचारासाठी मुंबईला शिफ्ट होण्याच्या सूचना केल्यानंतर मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले, कराड येथे जे उपचार चालू होते तेच मुंबई येथे देखील चालू ठेवले.आणि २१ तारखेला डिस्चार्ज घेऊन ते कराडला आले.   डिस्चार्ज घेतल्यानंतर  नियमानुसार १० दिवस ते होम आयसोलेट राहून काल पुन्हा चाचणी करुन ती निगेटीव्ह आले नंतर मुंबईस रवाना झाले आहेत.

ते उपचार घेत असताना अनेकांनी साहेब लवकर बरे व्हावेत यासाठी फोनवरून , सोशल मिडीयाव्दारे  तर काही गावांमध्ये देवाला साकडे घालण्यात आले.  सर्वांच्या सदिच्छा व आशिर्वादामुळे ते पूर्णपणे बरे होऊन विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचे कामकाजासाठी आज मुंबईकडे रवाना झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post