समर्थकांना दिसतोय ’या’ युवा नेत्यामध्ये भविष्यातील मुख्यमंत्री...VIDEO

समर्थकांना दिसतोय ’या’ युवा नेत्यामध्ये भविष्यातील मुख्यमंत्री

नगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू असलेले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडे भविष्यातील मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे. आपल्या कार्यशैलीमुळे अल्पावधीतच राजकीय पटलावर ठसा उमटविण्यात आ.पवार यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच त्यांच्या समर्थंकांकडून भविष्यातील मुख्यमंत्री म्हणून आ.रोहित पवार यांना संबोधले जात आहेत. व्टिटरवर 'आपला रोहित' या अकाउंटवर त्यांच्या समर्थकांनी एक व्हिडिओ अपलोड करतानाच ‘भविष्यातील मुख्यमंत्री’ अशी टॅगलाईन दिली आहे. आपला रोहित हे आ.रोहित पवार यांचे अधिकृत फॅन पेज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आ.रोहित पवार यांचा अभ्यास, काम करण्याची धडाडी याचे दाखले देत समर्थकांकडून कर्जत जामखेडला थेट मुख्यमंत्रीपदाची संधी भविष्यात मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
VIDEO


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post