के.के. रेंज च्या भुसंपादनाचा आरक्षण हटविल्याचा कागद जनतेला दाखवावा - माजी आमदार शिवाजी कर्डिले
राहुरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काही दिवसापासुन के.के.रेंज च्या विषयी राजकारण करित आहे. आधीच नागरिकांची मनस्थिती बिकट असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन के.के.रेंज च्या विषयी जमिनीचे भुसंपादन होणार नाही अशी राष्ट्रवादीने भुमिका मांडली खरी परंतु त्यांनी संरक्षण विभागाचा के.के. रेंज च्या भुसंपादनाचा आरक्षण हटविल्याचा कागद जनतेला दाखवावा तरच आम्ही त्यांच्या प्रयत्नांना यश आले म्हणू आणि त्यांचे स्वागत करु व इतर निवडणूकीत त्यांना जाहीर पाठिंबा देऊ असे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटंले आहे. राष्ट्रवादीकडे कुठल्याही प्रकारचा संरक्षण विभागाचा आरक्षण उठविल्याचा कागद नाही. केवळ दिल्लीच्या वारीने हा प्रश्न सुटणार नाही असे माजी आमदार कर्डिले यांनी म्हटंले आहे. तसेच राज्यात सरकार मध्ये पक्ष तीन आहेत तरीही कोरोनाची स्थिती बिकट आहे तशीच राहुरी मतदारसंघात आतापर्यंत आमदार होते आता नामदार आहे. परंतु मंत्री महोदयांकडून राज्यात तर सोडाच मतदारसंघात सुद्धा विकास झालेला नाही. एकीकडे जनता कोरोनाने मरते आहे तर मंत्री मात्र मुंबईला आरामात उपचार घेत आहे अशा शब्दांत राज्यमंत्री तनपुरे यांचे नाव न घेता मा.आ.कर्डीले यांनी त्यांच्यावर टिका केली.
Post a Comment