नगरमध्ये रविवारी माजी मंत्री अनिल राठोड यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

 नगरमध्ये रविवारी माजी मंत्री अनिल राठोड यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली



नगर शहर व जिल्हा शिवसेनेच्या वतीने रविवारी 

आ. अनिल भैय्या राठोड  श्रद्धांजली सभेचे  आयोजन 

  अहमदनगर-   शिवसेनेचे उपनेते मा . आ. धर्मवीर अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे. नगर मधील बुरूडगाव रॉड येथील नक्षत्र लॉन येथे ही सभा होणार आहे . रविवार दिनाक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत ही सभा होईल . राज्याचे मुख्यमंत्री , शिवसेना  पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे लाईव्ह सभेला संबोधित करणार आहेत . कोरोना काळात सोशल डिस्टंसिंग चे तसेच   शासनाचे सर्व नियम पाळून ही सभा होणार आहे . राज्यातील नेते मंडळी , मंत्री महोदय तसेच सर्व पक्षीय नेते मंडळी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत . या सभेत धर्मवीर अनिल भैय्या यांच्या जीवनावर आधारित एक ध्वनिचित्रफीत दाखविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ही सभा सोशल मीडिया प्रमोशन हॅन्डल द्वारे फेसबुक यु ट्यूब वर लाईव्ह दाखविण्यात येणार आहे. तरी या सभेस सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा . शशिकांत गाडे व उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post