कोरोनाचे वेळेत निदान व उपचार केले तर कोरोनातून बचाव होऊ शकतो- डाॅ राजेंद्र विखे

लोणी - कोरोनाचे वेळेत निदान व उपचार केले तर कोरोनातून बचाव होऊ शकतो यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी गरज असेलं तेव्हा कोविड चाचणी केली पाहिजे असे आवाहन प्रवरा मेडिकल ट्रस्ट अध्यक्ष डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज केले .प्रवरा मेडिकल ट्रस्टने आधुनिक आरटीपीसीआर ही यंत्रणा बसवली आहे. या सुविधेचा व स्वॅब कलेक्शन  सेंटरचा लोकार्पण आज डाॅ राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कुलगुरु डाॅ वाय.एम.जयराज, मेडीकल काॅलेजचे अधिष्ठाता डाॅ. राजवीर भलवार, पंजाबराव आहेर पाटील माॅयक्रोबाॅयलोजी विभाग प्रमुख डाॅ शरीयार रोशनी , डाॅ राहुल कुंकुलोळ आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलतांना डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी यापूर्वी कोरोना चाचणी करतांना शासकीय व संस्थात्मक मर्यादेत चाचणी करावी लागत असे पण आता या अधिकच्या तंत्रज्ञानामुळे कोणी ही कधी ही किती ही वेळा चाचणी करु शकणार आहे. यामुळे निदान वेळेत झाले तर उपचारही ही वेळेत केले जातील परिणाम जिवित हानी टळेल म्हणुन जिल्ह्यातील नागरिकांनी या आरोग्य सेवेचा उपयोग करुन घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


लोनटेक मंदीराच्या पायथ्या जवळ जागेत उभारण्यात आलेल्या या स्वॅब कलेक्शन सेंटर मधुन सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत आठवड्यातील सर्व दिवस कोणताही नागरीक आपली किंवा आपल्या कुटंबाची कोरोना चाचणी शासकीय दराने करु शकणार असल्याचे माॅयक्रोबाॅयलोजी विभाग प्रमुख डाॅ शरीयार रोशनी यांनी सांगितले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post