निर्णय घ्या अन्यथा आदेश झुगारुन मंदिरात प्रवेश करावा लागेल

निर्णय घ्या अन्यथा आदेश झुगारुन मंदिरात प्रवेश करावा लागेल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

मुंबई : राज्य सरकारने मंदिरे खुली करावीत यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले असून सरकारने उगीच पुरोगामीत्त्व न दाखवता हिंदू मंदिरे खुली करावीत अन्यथा सरकारचे आदेश झुगारुन मंदिरात प्रवेश करावा लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारचे काही बाबतीतील धोरण शैथिल्य फारच बुचकाळ्यात टाकणारं आहे. सरकारच्या डोळ्यावर कुठली गुंगीची झापड आली आहे की? श्रध्दाळू हिंदू भाविकांचा कंठशोष त्यांच्या कानावर पडत नाही. अनलॉक प्रक्रियेचे विविध टप्पे सुरु आहेत. मॉल्स उघडण्यात आलेत, 100 लोकांच्या उपस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली जात आहे. मग भक्तांची व देवाची ताटातूट सुरुच आहे. करोनामुळे सुरुवातीला लॉकडाऊन केला तेव्हा मंदिरेही बंद होती. आम्ही तेव्हा समर्थनच केले होते. मधल्या काळात आषाढी वारी, गणेशोत्सव काळात हिंदूंनी सामंजस्य दाखवले. एका मंदिरावर गावाची, शहराची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्याचाही विचार व्हायला हवा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post