राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी, मध्य रेल्वेचे परिपत्रक जारी


राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी, मध्य रेल्वेचे परिपत्रक जारी

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी अनलॉक 4 ची नियमावली जाहीर केली आहे.  या गाईडलाईन्समध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी असणारी ई-पासची अट रद्द करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. राज्य सरकारच्या गाईडलाईन्सच्या आधारावर मध्य रेल्वेने परिपत्रक जारी करत राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला सुरुवात करत असल्याची माहिती दिली आहे 
सध्या राज्यात 200 रेल्वे गाड्या सुरु आहेत. या गाड्यांमधून प्रवास करण्यास सर्वसामान्य नागरिकांना परवानगी नव्हती. मात्र, आता राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनाही रेल्वेने प्रवास करता येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे
राज्यांतर्गत रेल्वे प्रवासासाठी सर्वसामान्यांना ऑनलाईन तिकीट बुकिंग करणं जरुरीचं आहे. प्रवाशांना 2 सप्टेंबरपासून रेल्वे बुकिंग करता येणार आहे, असं रेल्वे प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post