हॉकर्स झोन करा नाही तर खळखट्याकसाठी तयार रहा...

 हॉकर्स झोन करा नाही तर खळखट्याकसाठी तयार रहा...

कॉंग्रेसचा महानगरपालिका प्रशासनाला आक्रमक इशारानगर : मनपाकडून शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, टपरीवाले, भाजीविक्रेते यांची अमानुष पद्धतीने पिळवणूक सुरू आहे. रस्त्यांच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत शहरातील हॉकर्स झोन जाहीर होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत या शहराची दैना संपणार नाही. तात्काळ हॉकर्स झोन घोषित करा. अन्यथा कॉंग्रेस मनापा सत्ताधारी, प्रशासनाच्या विरोधात खळखट्याक  करण्यासाठी रस्त्यावर उतरेल, असा सज्जड इशारा कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.


प्रोफेसर कॉलनी चौकातील भाजीवाल्यांवरील कारवाईपासून या विषयाला शहरात तोंड  फुटले आहे. कॉंग्रेस याबाबत अधिक आक्रमक झाली आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचा सखोल अभ्यास करत शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी मनपाच्या विरोधात कॉंग्रेसचा मोर्चा उघडला आहे. मनपातील सत्ताधारी, आयुक्त, अतिक्रमण विभाग प्रमुख तसेच अन्य संबंधित विभागांनी शहराचा चालवलेला खेळखंडोबा थांबवावा. अन्यथा नगर शहरातील नागरिकांसाठी कॉंग्रेसला मैदानात उतरावे लागेल, असा इशारा काळे यांनी दिला आहे.

याबाबत मांडणी करताना काळे म्हणाले की, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड आदी मनपांनी काम केले आहे. नगर मनपा मात्र गाढ झोपलेली आहे. सन - मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण आले होते. त्यावेळी नगर मनपाने सर्व्हेक्षण  करून शहरातील फेरीवाल्यांची संख्या नोंदणी करून घ्यायची होती. तसेच यासाठीच्या समितीची स्थापना करायची होती. त्या माध्यमातून धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करायची होती. परंतु त्यामध्ये काहीच काम केले गेले नाही.

सुप्रीम कोर्टाच्या नवीन सूचनांप्रमाणे या धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया नव्याने राबविण्याची गरज होती. महापालिकेने बायोमेट्रिक सर्व्हेक्षण करत या संबंधीची आखणी करण्याची आवश्यकता होती. शहरामध्ये हॉकर्स झोन निश्चित करून तो घोषित करण्याची गरज होती. परंतु कोणत्याही प्रकारची कृती या संदर्भामध्ये महापालिके-च्यावतीने मागील सहा वर्षांमध्ये करण्यात आली नाही.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post