ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज दिवसभर अन्नत्याग

 ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज दिवसभर अन्नत्याग

कृषी विधेयक तात्काळ रद्द करण्याची मागणीमुंबई : राज्यसभेत शेतकरी विधेयकावरून झालेला गदारोळ, गोंधळात मंजूर केलेले विधेयक, शेतकर्‍यांवर केंद्र सरकार करत असलेला अन्याय तसेच आठ सदस्यांचे निलंबन याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज दिवसभर अन्नत्याग करत असल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना खा.पवार यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक तात्काळ रद्द करावे, अशीही मागणी केली आहे. 

खा.पवार म्हणाले की, राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी कृषीविधेयकावर सदस्यांना बाजू मांडू दिली नाही. उलट सदस्यांचा विरोध डावलून तात्काळ आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर केलं आणि भावना व्यक्त करणार्‍या सदस्यांना निलंबितही केलं. मी गेली 50 वर्षे संसदीय राजकारण करत असून गेल्या 50 वर्षांत मी राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं असं वर्तन पाहिलं नाही. कृषी विधेयक नियमाच्या विरुद्ध आहे, असं सदस्य सांगत होते. पण त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे सदस्यांनी वेलमध्ये धाव घेऊन नियमांचं पुस्तक दाखवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात हे पुस्तक फाडलं गेलं. किमान सदस्य काय नियम सांगत आहेत. हे ऐकून घेण्याची अपेक्षा उपाध्यक्षांकडून होती. पण त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. त्यांनी तातडीने आवाजी मतदान घेऊन हे विधेयक मंजूर केलं. सदस्यांशी चर्चा न करता हे मतदान घेण्यात आलं. त्यामुळे हे शेतकरी विरोधी विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावं, अशी मागणी पवारांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post