कदाचित नगरकरांनी घरीच रहावे म्हणून रस्ते दुरुस्ती होत नसेल

 कदाचित नगरकरांनी घरीच रहावे म्हणून रस्ते दुरुस्ती होत नसेल

उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचा रस्त्यांच्या दुरवस्थेवरुन प्रशासनाला मार्मिक टोलानगर : नगर शहरातील व शहरातून जाणार्‍या महामार्गांच्या दुरवस्थेवरुन राजकीय कलगीतुरा चालू असून त्यातून नगरकरांना चांगले रस्ते कधी मिळतील हे सांगता येत नाही. मात्र खड्डयांमुळे नगरकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय हे वास्तव आहे. नगरच्या विकासाच्या दृष्टीकोन घेवून आय लव्ह नगर चळवळ चालवणारे उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी शहरातील खराब रस्त्यांवर मार्मिक भाष्य करीत ‘अरे कुठे नेऊन ठेवलाय अहमदनगर माझा?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

आय लव्ह नगरने आपल्या अधिकृत व्टिटर अकाउंटवरुन नगरमधील खड्डेमय रस्ते व त्यामुळे नागरिकांना होणार्‍या त्रासाबाबत भाष्य केले आहे. आय लव्ह नगरच्या या पोस्टवर नरेंद्र फिरोदिया यांनी उपरोधिक शैलीत मत मांडत मार्मिक टिप्पणी केली आहे. ‘अहमदनगरमधील रस्ते कदाचित प्रशासन यामुळे दुरुस्त करत नाहीये कि, त्यांना सुद्धा अप्रत्यक्षरीत्या सांगायचे आहे... घरी रहा... सुरक्षित रहा!’ अशा शब्दात फिरोदिया यांनी प्रशासनाला टोला लगावला आहे. फिरोदिया यांच्या या पोस्टला अनेकांनी प्रतिसाद देत वास्तव मांडल्याचे म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post