राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना करोनाची लागण


राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना करोनाची लागण

नगर : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना करोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत:च व्टिट करून करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ‘सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार, असे व्टिट त्यांनी केले आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंत्री, आमदारांना करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. यात नगर जिल्ह्यातील आ.मोनिका राजळे तसेच आता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार
Raised fist

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post