सेंद्रिय अन्नासाठी महिलांनी परसबाग पुरवावी : शालिनीताई विखे

 सेंद्रिय अन्नासाठी महिलांनी परसबाग पुरवावी : शालिनीताई विखेलोणी : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य चांगले राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृकता झाली असली तरी शारीरीक तंदुरूस्तीसाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्वाचे घटक आता परसबागेच्या माध्यमातून घरातच निर्माण करावे लागणार आहे. कुटूंबाच्या आरोग्यासाठी घर तिथं परसबाग ही संकल्पना प्रत्येक गावात राबविण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी केले.


पंतप्रधान नरेंद्रजी  मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिर्डी विधानसभा मतदारसंघात आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फौंडेशन आणि बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आहार, आरोग्य आणि परसबागेच्या संदर्भात प्रात्यक्षिक आणि बियाणे व रोपांचे वाटप बचत गटातील महीलांना शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सतिष कानवडे, ईफको कंपनीचे कार्यकारी अधिकारी दिनेश  देसाई, जनसेवा फौंडेशनचे डॉ. हरिभाउ  आहेर, माजी सरपंच सौ. मनिषा आहेर, केंद्राच्या शास्त्रज्ञा सौ. अनुराधा वांडेकर, प्रकल्प अधिकारी सौ.रूपाली लोंढे, महेश आहेर यांच्यासह महीला उपस्थित होत्या.


 


आपल्या भाषणात सौ.विखे म्हणाल्या की कोविड संकटाने संपूर्ण जगालाच विचार करायला भाग पाडले. आरोग्याचे महत्व आहेच पण यापेक्षा शारीरीक तंदुरूस्तीसाठी योग्य आणि वेळेवर आहाराची शिकवण आपल्या सर्वांना मिळाली असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक महिलेने आपल्या परस बागेत ही पारंपारीक बियाणे जतन करून पुढील पाच महिलांना भेट द्यायच्या आहेत. त्यामुळे पारंपारीक बियाणांचे जतन होऊन प्रसारही होईल. सेंद्रीय अन्न हेच आता औषध ठरत आहे. शरीरातील प्रतिकार शक्ती चांगली राहावी आवश्यक असलेली जीवनसत्त्वे आता परसबागेच्या माध्यमातून घरातच निर्माण करावी लागतील.


 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनवितानाच स्थानिक उत्पादनाचे महत्व अधोरेखित केले.परसबागेची संकल्पना  आता कृतीत उतरविण्यासाठी घरोघरी महीलांनी आता परसबागेचे महत्व पटवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन सौ.विखे यांनी केले. प्रारंभी अनुराधा वांडेकर यांनी प्रास्तविक केले. यावेळी पारंपारिक बियाणे, औषधी वनस्पती, हिरव्या पालेभाज्या, वेल वर्गिय भाज्या व रोपांचे महिलांना वितरण करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post