सभापती मनोज कोतकर कोणत्या पक्षाचे?...महापौर वाकळे यांनी दिलं ‘हे’ उत्तर

 सभापती मनोज कोतकर कोणत्या पक्षाचे?...महापौर वाकळे यांनी दिलं ‘हे’ उत्तरनगर : नगर मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीवेळी झालेल्या राजकारणावरुन भाजपमध्ये चिंता व्यक्त होत असताना आज सभापती मनोज कोतकर यांनी पदभार स्विकारुन कामकाजालाही सुरुवात केली. यावेळी सभापतींना शुभेच्छा देण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे हेही उपस्थित होते. त्यांना कोतकर यांच्या पक्षाबाबत विचारणा केली असताना त्यांनी ‘आज फक्त शुभेच्छा देवू द्या’ असे सांगत कोणतीही भूमिका मांडणे टाळले. 

शिवसेनेकडून सभापती कोतकर यांच्याकडे त्यांचा अधिकृत पक्ष जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आज भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड.अभय आगरकर यांनीही सभापती कोतकर यांनी पक्ष जाहीर करावा, अशी मागणी करीत नगरमधील या घडामोडींबाबत थेट प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांना हस्तक्षेप करण्याचे पत्र पाठवले आहे. दोन दिवसांपूर्वीच महापौर वाकळे यांनी कोतकर हे भाजपचेच असल्याचे म्हटले होते. मात्र आता पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षांनी तसेच ऍड.आगरकर यांनी कोतकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचे सूतोवाच केल्यानंतर महापौर वाकळे यांनीही या विषयावर मौन बाळगण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी सभापती कोतकर यांच्या पदभार कार्यक्रमावेळी कोतकर हे राष्ट्रवादीचेच असल्याचा पुनरुच्चार केला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post