पावसाने झोडपले, १५० ते २०० एकर ऊस पीक जमीनदोस्त...VIDEO

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाला वाऱ्यासह पावसाने झोडपले,ऊस पिकाचे प्रचंड नुकसान
१५० ते २०० एकर ऊस पीक जमीनदोस्त


खंडाळा - श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा या गावातील शेतकरी ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. काल ५ सप्टेंबर रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यातल्या त्यात गावातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचा ऊस हे भुईसपाट झाले असून यावर्षी ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. तसेच खूप मोठ्या आर्थिक संकटाला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. या परिसरातील शेतकरी आर्थिक संकटामुळे चिंताग्रस्त झाले आहे. तरी शासनाने इतर पिकांसोबत ऊस पिकांचे सुद्धा पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विलास राहणे, राजेंद्र मुंढे, अक्षय डेंगळे, गोरख राहणे,बाळासाहेब कल्हापुरे, अजित डेंगळे,  विजय ढोकचौळे,  खंडेराव सदाफळ, राम मुंढे, सुभाष बनकर,  अशोक मुंढे यांनी केली आहे.

VIDEO

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post