वारकरी मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी अमोल महाराज सातपुते तर कोषाध्यक्षपदी सुदाम महाराज दारकुंडे

वारकरी मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी अमोल महाराज सातपुते 

 तर कोषाध्यक्षपदी  सुदाम महाराज दारकुंडे  नगर - अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नगर तालुका अध्यक्षपदी हभप अमोल महाराज सातपुते यांची तर नगर तालुका कोषाध्यक्षपदी  जेऊर बायजाबाईचे येथील हभप सुदाम महाराज दारकुंडे यांची  निवड केली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष हभप  अनिल महाराज वाकळे व जिल्हाध्यक्ष गणेश महाराज डोंगरे यांनी त्यांना तसे पत्र देऊन सन्मानित केले.

     अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले व  गुरुवर्य हभप बाळकृष्ण महाराज भोंदे व हभप महंत भास्करगिरी महाराज श्रीक्षेत्र  देवगड संस्थान यांनी हभप सुदाम महाराज व हभप अमोल महाराज यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

     हभप सुदाम महाराज व अमोल महाराज यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले कीआम्हाला मिळालेल्या या पदाच्या माध्यमातून सामाजिकधार्मिकशैक्षणिक कामासाठी उपयोग करून जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून आम्ही सेवा करू.

     अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नगर तालुका या पदावर नियुक्ती झाल्यामुळे नगर तालुक्यातील व जेऊर पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post