पुरोगामी शिक्षक संघटना अखिल संघटनेत विलिन

 पुरोगामी शिक्षक संघटना अखिल संघटनेत विलिन

 जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांचा ऐक्य मंडळात जाहीर प्रवेश अहमदनगर: पूरोगामी  शिक्षक संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांनी आपल्या समर्थकांसह अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रणित ऐक्य मंडळात जाहीर प्रवेश केल्याची माहिती संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी दिली .


घोडेगाव ,ता.नेवासा येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी पुरोगामी शिक्षक संघटनेच्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच जिल्हा महिला आघाडी यांनी ही  या संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रणित ऐक्य मंडळात जाहीर प्रवेश केला आहे .यावेळी श्री सुनील जाधव यांचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व ऐक्य मंडळाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात येऊन त्यांची राज्यसंघावर नियूक्तीची शिफारस करण्यात आली आहे .


या प्रवेश सोहळ्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सुनील जाधव म्हणाले की अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही अतिशय जुनी संघटना असून राज्य तसेच देशपातळीवरील  प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे  कामी ही संघटना नेहमी अग्रेसर असते .ऐक्य मंडळ हा एक विचार असून या मंडळाची धोरणे ही अतिशय उच्च दर्जाची आहेत .


जिल्हा पुरोगामी शिक्षक संघटना संपूर्णपणे ऐक्य मंडळात विलीन झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये ऐक्य मंडळाची ताकत वाढणार असून आगामी प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत ऐक्य मंडळ महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी सांगितले .


याप्रसंगी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे ,राज्य संघटक राजेंद्र निमसे , संघाचे  जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सल्लागार विष्णू बांगर ,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी ढाकणे ,जिल्हा संघटक सुधीर रणदिवे ,प्राथमिक शिक्षक विकास मंडळाचे माजी संचालक पावलस  गोरडे ,नेवासा तालुकाध्यक्ष प्रदीप चक्रनारायण ,भाऊसाहेब घोरपडे, सर्जेराव ससाणे, बथूवेल हिवाळे, नितीन गायकवाड, सुनील पठारे, बाळू शिंदे, विष्णू मिसाळ, दीपक सरोदे, विरेश नवगिरे, अविनाश जावळे ,प्रवीण शिंदे, लेविय तिजोरे , फिलिप मकासरे आदी उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post