खासदार विखे कर्जत दौर्‍यावर असतानाच भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

 खासदार विखे कर्जत दौर्‍यावर असतानाच भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

आ.रोहित पवार यांना वाढदिवसानिमित्त मिळाले मोठे गिफ्टकर्जत (आशिष बोरा):-राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे विविध कार्यक्रम सुरू असताना अनपेक्षितपणे कोणताही गाजावाजा न करता भाजपाच्या दोन नगरसेवकांनी वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश करत आ. पवार यांना सरप्राईज भेट देऊन भाजपाला धक्का तर दिलाच पण स्थानिक राजकारणातील  समीकरणे ही बदलली. 

               राष्ट्रवादीचे आ रोहित पवार यांचा वाढदिवस मतदारसंघात मोठ्या उत्साहात पार पडत असताना कर्जत येथे सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके, नगरसेविका मनीषा सोनमाळी आणि त्यांचे पती माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन सोनमाळी याचे सह भाजपाचे माजी तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, कर्जत मधील प्रथितयश डॉ प्रकाश भंडारी, यांनी छोट्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर व युवक अध्यक्ष नितीन धांडे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील शेलार, दादासाहेब थोरात, भास्कर भैलूमे, रवी पाटील आदी सह अनेक जण उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांच्या पस्तिसाव्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम होत असताना या सर्वानी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत आमदार रोहित पवार यांना आगळीवेगळी भेट दिली. शेवटी तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी सर्वाचे पक्षात स्वागत करत आपल्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल असा शब्द दिला.

             आगामी नगरपंचायतची निवडणूक विचारात घेता कर्जत मध्ये अनेक घडामोडी पहावयास मिळणार आहेत. कर्जत जामखेड मतदार संघात विकास पर्व सुरू झाले असून या परिवर्तनात अनेक जण सहभागी होणार असून लवकरच मोठा पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार असल्याची माहिती नगरसेवक बापूसाहेब नेटके यांनी  यावेळी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post