जायकवाडीचे 12 दरवाजे उघडले, गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग

जायकवाडीचे 12 दरवाजे उघडले, गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग

औरंगाबाद : मराठवाड्यासाठी वरदान असलेले जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून पाणीसाठा राखून जायकवाडी धरणाचे तब्बल 12 दरवाजे उघडण्यात आले आहे. 12 दरवाज्यातून गोदावरी नदी पत्रात विसर्ग सुरू असून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  7877 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.  जायकवाडी धरणाच्या बॅक वाटर भागात पावसाची जोरदार हजेरी असून जायकवाडी धरणात 13 हजार क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू. वरच्या बाजूची धरणे भरल्याने या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावलेली असल्याने राज्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post