जायकवाडी धरण भरले गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरण भरले  गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जाहीर आवाहन

विषय:- जायकवाडी धरणातुन गोदावरी नदीपात्रात पाणी सोडणे बाबत.
         आज दिनांक 04/09/2020 रोजी ठीक सकाळी 06:00 वाजेपर्यंतचा जायकवाडी धरणातील पाणीसाठा 97.08% इतका झालेला आहे तथापी ऊर्ध्व भागातील धरणातून व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातुन  येणाऱ्या पाण्याची आवक दर तासी काही प्रमाणात वाढत आहे  तेव्हा उपरोक्त बाबीचा विचार करता धरणात येणाऱ्या पाण्याची आवक अशाच प्रकारे वाढत राहीली तर यापुढे कोणत्याही क्षणी जायकवाडी प्रकल्पाच्या सांडव्यामधुन गोदावरीनदीपात्रात विसर्ग सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होईल 
      तेव्हा गोदावरी नदीकाठच्या गावाना या जाहीर आवाहनाव्दारे सूचीत करण्यात येते की नदीपात्रातील चल मालमत्ता,चीज वस्तु,वाहने, जनावरे, पाळीवप्राणी , शेती आवजारे व इतर साधने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे व नदीपात्रात कोणीही जाऊ नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
  
                  आदेशान्वये
            कार्यकारी अभियंता
      जायकवाडी पाटबंधारेविभाग                                   

            नाथनगर उत्तर पैठण

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post