विश्वास नर्सिग होममधील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी

 विश्वास नर्सिग होममधील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी

रहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये 


नगर : कोरोना हा संसर्ग विषाणू आहे. एकमेकांपासून संसर्ग वाढण्याची भीती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे नगर
जिल्ह्यामध्ये दररोज रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शासन एकीकडे संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करत
आहे. तर दुसरकडे अहमदनगर महानगरपालिका दाटवस्ती भागातच कोविड सेंटरला परवानगी देण्याचे काम करत आहे. तरी
सारसनगर रोडवरील निशांत रो-हाऊसिंग, निलायम रो-हाऊसिंग, कर्पे मळा, निळकंठ कॉलनी, आनंद पार्क हा परिसर दाट
लोकवस्तीचा असून तसेच मार्केटयार्ड, भाजी मार्केट व सारसनगरला जाणारा मुख्य रस्ता विश्वास नर्सिंग होम या
हॉस्पिटलपासन जात आहे. या ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्याबाबत हालचाली सुरू आहे. हे कोविड सेंटर चालू केल्यास या
आजाराचे संक्रमण होऊन शेकडो नागरिकांना या आजाराला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या
परिसरात या कोविड सेंटरला परवानगी देऊ नये. परवानगी दिल्यास नगरसेवकासह नागरिक महिला तीव्र स्वरुपाचे आंदोलन
आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना निवेदनाद्वारे
देऊन चर्चा करताना नगरसेवक प्रकाश भागानगरे, अविनाश घुले, प्रशांत पाठक, उमाकांत शेरकर, सुशील शिंगवी, कृष्णा
भुताडा, हिरालाल चोपडा, राजेंद्र लोढा, योगेश मेहेर, किसन कर्पे, राजू ससाणे, धनेश मुनोत आदी नागरिक उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post