नगर-मनमाड महामार्गाबाबत बैठक संपन्न दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची ग्वाही
लोणी -नगर मनमाड मार्गाच्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री अशोकराव चव्हाण यांनी तातडीच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी रूपये उपलब्ध करून देण्याची ग्वाही देतानाच,या मार्गाच्या पुढील संपूर्ण कामासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी मिळवून काम पूर्ण करण्याची तयारी असल्याचे आश्वासन देवून तूर्तास आंदोलन न करण्याची विनंती आ.विखे पाटील यांना केली.
नगर मनमाड मार्गाच्या गंभीर परिस्थितीचे फोटो आणि व्हीडीओची सीडी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री अशोक चव्हाण यांना पाठवून कोणत्याही क्षणी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे दिला होता.या पार्श्वभूमीवर मंत्री अशोकराव चव्हाण यांनी मंत्रालयात आ.विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाच्या सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती.आ.आशुतोष काळे यांच्यासह जिल्हयाचे पालक सचिव नितीन करीर,रस्ते विभागाचे सचिव देबडवार,मुख्य अभियंता पद्माकर भोसले जे.डी.कुलकर्णी,कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरू,आर आर पाटील उप अभियंता अंकुश पालवे एस. आर. वर्पे आदी उपस्थित होते.
मंत्री अशोक चव्हाण यांनी बैठकीत रस्त्याच्या सध्या निर्माण झालेल्या वस्तुस्थितीची माहीती आ.विखे यांच्याकडून जाणून घेतली.प्रशासकीय स्तरावरुन या मार्गाच्या कामासाठी यापूर्वी मिळालेली मंजूर आणि अर्थिक निधीच्या तरतूदीचा सविस्तर आढावा बैठकीत मंत्री चव्हाण यांनी घेतला.
आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी या रस्त्याच्या परिस्थितीमुळे नागरीकांची होत असलेली आडचण,वाहतूकीला होणारा खोळंबा तसेच रस्त्यावरील पाण्याला कोणतीही वहीवाट नसल्याने रस्त्याच्या कामाचे सातत्याने होणारे नूकसान मंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले.प्रशासकीय स्तरावर याचा पाठपुरावा करूनही अधिकार्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याकडे आ.विखे यांनी बैठकीत मंत्र्याचे लक्ष वेधतानाच कहीही करा आणि काम पूर्ण करुन मार्ग सुरळीत करून देण्याची आग्रही मागणी आ.विखे यांनी केली.
मंत्री चव्हाण यांनी परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून रस्त्याच्या तातडीच्या दुरूस्ती कामासाठी ४० कोटी रूपये उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.या निधीतून रस्त्याचे व बाह्यवळण रस्त्याचे तात्पुरते दुरूस्ती काम पूर्ण करण्याची तयारी दर्शविली.परंतू हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने याचे काम भविष्यात वेगाने पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
नगर मनमाड या रस्त्याच्या रूंदीकरण आणि मजबूती करणासाठी नव्याने पुन्हा प्रस्ताव करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी उपस्थित अधिकार्याना दिल्या.त्यानूसार कोल्हार आणि बाभळेश्वर येथील पूलाचे काम चौपदरी करण्याचा तसेच पुणतांबा फाटा आणि कोपरगाव येथे उड्डाणपूलाची कामे प्स्तावित कराव रस्त्याच्या दुर्तफा साईड गटार, नागरी वस्त्या असलेल्या ठिकाणी साईड गटारीची कामे करून आगामी काळात हा मार्ग दर्जेदार कामातून सुस्थितीत करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी अधिकार्याना दिल्या..राज्य सरकार बरोबरच केंद्र सरकार कडूनही या रस्त्यासाठी निधी मिळावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचे मंत्री चव्हाण यांनी बैठकीत सांगितले.
Post a Comment