आज ६१० बाधितांची रुग्णसंख्येत भर

दिनांक: ०१ सप्टेंबर २०२०, रात्री ०७  वा

आज ६८१ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता साडेअठरा हजाराहून अधिक

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.०४टक्के

आज ६१० बाधितांची रुग्णसंख्येत भर


अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६१० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२२५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २४७, अँटीजेन चाचणीत ७४ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६८, संगमनेर २५, पाथर्डी ०७, नगर ग्रामीण २५, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०४, श्रीगोंदा ३८, पारनेर १४, अकोले ०२, राहुरी ०५, शेवगाव ३६, कोपरगाव ०९, जामखेड ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ७४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर १०, राहाता १६ , पाथर्डी ०२, श्रीरामपुर १५, कॅंटोन्मेंट ०७, श्रीगोंदा ०१, अकोले ०२,  शेवगाव ०१,  आणि कर्जत २० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १४६, संगमनेर ०३, राहाता १९, पाथर्डी ०४,  नगर ग्रामीण २८, श्रीरामपुर २४,  कॅन्टोन्मेंट ०७, नेवासा १७, श्रीगोंदा ०५,  पारनेर ०७, अकोले ०२,  राहुरी १७, शेवगाव ०३,  कोपरगांव ०२, जामखेड ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ६८१ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २६९, संगमनेर ४५, राहाता ४७, पाथर्डी ०९, नगर ग्रा.४९, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा १३, श्रीगोंदा ४०, पारनेर १२, अकोले ५०, राहुरी २५, शेवगाव १८,  कोपरगाव २७, जामखेड २८, कर्जत ०४, मिलिटरी हॉस्पिटल ०४ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: १८५५७

उपचार सुरू असलेले रूग्ण:३२२५

मृत्यू: ३००

एकूण रूग्ण संख्या:२२०८२

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

सार्वजनिक ठिकाणी संपर्क आणि गर्दी टाळा

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावूनच बाहेर पडा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post