मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

नगर : स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. राजू भाऊसाहेब सदाफळ (रा.वार्ड नं.2, श्रीरामपूर) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा 6 हजार रुपये किंमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. दि.2 फेब्रुवारी रोजी अश्विनी संजय पवार (रा.कोल्हेवाडी रोड, संगमनेर) यांच्या इलेक्ट्रॉनिक दुकानातून हा मोबाईल चोरीस गेला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या चोरीचा समांतर तपास करीत आरोपी सदाफळ याला ताब्यात घेतले. त्याचा सौरभ संजू शिंदे (रा.फकिरवाडा, श्रीरामपूर) या साथीदारासह ही चोरी केल्याची कबुली दिली. शिंदे हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. या कारवाईत पोहेकॉ मनोज गोसावी, शंकर चौधरी, रवीकिरण सोनटक्के, सचिन आडबल, विशाल दळवी यांनी सहभाग घेतला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post